धुळे : शहरातील ऐंशीफुटी रस्त्याची तत्काळ दुरूस्ती न केल्यास खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे (उबाठा) देण्यात आला. खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. अनेक वर्षापासून शहरातील ऐंशीफुटी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खासदार भामरे यांच्या निवासस्थानासमोरच खड्डे पडले आहे. पादचारी, वाहनधारकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा : रहिवाशांच्याा आंदोलनाने यंत्रणा हलली अन् पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरुवात; वाचा नेमकं प्रकरण काय आहे ते…
पावसाळ्यात आणि इतरवेळीही खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. असे असतांना खासदारांना या रस्त्याची दुरुस्ती करावी, असे वाटत नाही का? असा प्रश्न निवेदनातून शिवसेनेचे माजी नगरसेवक पुरूषोत्तम जाधव, संदीप चौधरी, पंकज भारस्कर, आबा भडांगे आदींनी उपस्थित केला आहे.