नाशिक : अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी शिवसेना ठाकरे गटाने श्रीरामाच्या भूमीचा संदर्भ देत नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती आणि रामकुंडावर गोदा पूजन करणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी पक्षाचे राज्यव्यापी महाशिबीर व सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. या निमित्ताने शहरातील प्रमुख चौक व रस्ते झेंडे, पताकांनी भगवेमय करून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने नाशिक या प्रभु श्रीरामाच्या भूमीतून लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे जाहीर केल्यानंतर भाजप, शिवसेनेसह (शिंदे गट) राजकीय पदाधिकाऱ्यांचा काळाराम मंदिरात दर्शनासाठी ओघ सुरु झाला. अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाने नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. मंगळवारी सकाळी त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रसी येथे महाशिबीर होईल. त्यात राज्यभरातून सुमारे १६०० प्रतिनिधी सहभागी होत आहेत. याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. यावेळी शाहिरी, पोवाडे, अंबाबाईचा गोंधळ अशा सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. सकाळच्या शिबिरात लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले जातील. त्या अनुषंगाने काही ठराव मांडले जाणार आहेत.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…

हेही वाचा… Ram Mandir Ayodhya Inauguration Live: “मोदींनी कधीच प्रभू श्रीराम यांच्या तत्वांंचं पालन केलेलं नाही”, भाजपा नेत्याची परखड टीका!

अयोध्येतील लढ्यात शिवसेनेचे राज्यातील तत्कालीन खासदार, जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख असे अनेक जण सहभागी झाले होते. या कारसेवकांवर झालेल्या कारवाया, पोलीस ठाणे व न्यायालयातील हजेरी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शिबीर स्थळी होणार आहे. यावेळी कारसेवकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. शिवसेनेने भव्य गंगा आरतीची सुरुवात केली. त्याच पध्दतीने येथेही गंगा पूजन केले जाणार आहे. नाशिकमधील सोमवारी होणारे कार्यक्रम बिगर राजकीय असून त्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

हेही वाचा… राम मंदिरासाठी वडिलांनी लाठ्या खाल्ल्या, रोहिणी खडसे यांचा दावा

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेतून फोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व कार्यक्रम आणि सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

Story img Loader