नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाला अखेर पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले असून यामुळे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. प्रवीण पाटील नवनियुक्त शिक्षणाधिकारी असून त्यांनी पदभार स्विकारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ५० हजारांची लाच घेताना महिलेसह मंडळ अधिकारी जाळ्यात

नाशिक जिल्ह्याच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारतांना अटक केल्यानंतर त्यांच्या जागी रामदास हरळ यांची एक महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती. एक महिन्याच्या कालावधीतच ते सेवानिवृत झाल्याने त्यानंतर नंदुरबार येथील शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्याकडे पदभार देण्यात आला. कदम यांच्यावर अन्य जबाबदाऱ्याही असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविताना कदम यांना अडचणी येत होत्या. नाशिक जिल्ह्याचा विस्तार पाहता पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेरीस प्रवीण पाटील यांची शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पाटील याआधी नाशिक येथे प्रभारी शिक्षणाधिकारी, प्रभारी उपसंचालक होते. नाशिकची शैक्षणिक प्रतिमा सुधारण्याचे आवाहन त्यांच्यासमोर आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praveen patil is the new secondary education officer of nashik zilla parishad dpj