नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विविध पथकांसह क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

हेही वाचा- जळगाव : गोद्रीत बंजारा समाजाच्या महाकुंभाची तयारी पूर्णत्वास

निवडणुकीसाठी ध्वनिचित्रफीत देखरेख पथक, भरारी पथक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी नियुक्त केलेले भरारी पथक व ध्वनिचित्रफीत देखरेख पथक यांच्या प्रमुखांना शासन अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून निवडणूक कालावधीपर्यंत तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना २८ जानेवारी रोजी सायंकाळी सहापासून ३० जानेवारी रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे.

Story img Loader