नाशिक फर्स्ट ट्रॅफिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई नाका येथील संस्थेच्या आवारापासून इ कचरा संकलन मोहिमेस सुरूवात करण्यात येणार आहे.सध्याच्या तंत्रस्नेही जगात तंत्रज्ञानाची कास धरून चुटकीसरशी कार्यालयीन, शैक्षणिक आणि वैयक्तिक कामे केली जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि स्मार्ट गॅझेट्सचा वापर आणि खप प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक कचरा अखंडपणे निर्माण होत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट होत नसल्याचे चित्र आहे. अवैज्ञानिक पद्धतींनी इ कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि माती प्रदूषित होत आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कॉम्प्युटर सायन्स ऑफ इंडिया नाशिक, पूर्णम इकोव्हिजन पुणे आणि पर्यावरण संरक्षण ग्रुप यांच्या सहकार्याने इ-यंत्रण ही इ कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा