नाशिक – स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्य शासन यांच्यातर्फे येथे मायटेक्स्पो २०२३ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात वेगवेगळ्या आस्थापनांचे तीनशेहून अधिक दालन राहणार आहेत. सहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रदर्शनाची तयारी पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. समारोप उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होईल.

राज्यातील व्यापार उद्योगांना चालना मिळावी, म्हणून महाराष्ट चेंबरतर्फे राज्याच्या विविध भागांत मायटेक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यांत मुंबई येथे हे प्रदर्शन पार पडल्यावर दुसऱ्या राज्यव्यापी प्रदर्शनासाठी नाशिकची निवड करण्यात आली. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. त्याचे भूमिपूजन दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, खासदार हेमंत गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार
congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा
Wardha, P M Vishwakarma Yojana, artisans,
देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री
controversy regarding Siddesh Kadam Mercedes visit Inconsistencies in Maharashtra Pollution Board claims pune print news
सिद्धेश कदम यांच्या मर्सिडीज भेटीचे गौडबंगाल! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दाव्यात विसंगती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन
The developer for the Municipal Corporation project to withdraw the redevelopment of Kamathipura from MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’कडून काढून घेण्याच्या हालचाली; विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय?
Cleanliness of Pratapgad in view of the visit of the UNESCO team satara
‘युनेस्को’ पथकाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडची स्वच्छता

हेही वाचा – नाशिक : पाण्यासह जनावरांसाठी आता चारा उपलब्ध, पांगरीतील गंभीर समस्येवर पालकमंत्र्यांची सूचना

प्रदर्शनाद्वारे व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांना व्यवसायवृद्धीची संधी उपलब्ध होणार असून अधिकाधिक नाशिककरांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. प्रदर्शनात विविध क्षेत्रातील बड्या उद्योगांसह व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था, कृषी प्रक्रिया उद्योगांचा सहभाग राहणार आहे. व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या नवीन संधीसह विविध विषयांवर चर्चासत्र होणार असल्याचे चेंबरने म्हटले आहे.

हेही वाचा – धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी; शिरपूर तालुक्यात मुद्देमाल जप्त

यावेळी चेंबरचे अध्यक्ष गांधी, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरीष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, कांतीलाल चोपडा, नितीन बंग, शाखा अध्यक्ष संजय सोनवणे, समन्वयक सचिन शाह, सहसमन्वयक मिलिंद राजपूत, आयमाचे निखिल पांचाळ, धान्य व्यापारी संघटनेचे प्रफुल संचेती यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.