नाशिक – मालेगाव गृहरक्षक पथकाचे समादेशक अधिकारी अय्युबखान पठाण यांना स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त गृहरक्षक आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे.पठाण हे १९९२ पासून गृहरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या संघटनेत दिलेल्या दिर्घ सेवेचे योगदान आणि संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल या पुरस्कारानिमित्ताने घेण्यात आली आहे.

पठाण यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे महासमादेशक डॉ. उपाध्याय, उपमहासमादेशक प्रभातकुमार यांनी तसेच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक तथा जिल्हा गृहरक्षक समादेशक माधुरी केदार-कांगणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Story img Loader