धुळे: जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून सात संशयितांविरुध्दही हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सण आणि उत्सवाच्या काळात विघ्न येऊ नये,यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव, ईदच्या काळात नागरिकांनी सामाजिक सलोखा राखावा, एकोप्याने येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करून जिल्ह्याची शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

हेही वाचा… विश्वकर्मा योजनेसाठी प्रभावी अमलबजावणी आवश्यक, डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन

आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची शांतता समितीची बैठकही झाली. यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी असल्याने त्यांच्या मिरवणुकीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. एक दिवसाआड या मिरवणुका निघतील. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील दक्षता बाळगली जाणार आहे. समाजाला बाधा ठरतील अशा समाजकंटकांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई आणि हद्दपारीचे आदेश अधीक्षक बारकुंड यांनी दिले आहेत. १२ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार आहे. २०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preventive action and deportation orders have been issued against those who disturb the society during festivals and celebrations in dhule dvr
Show comments