जळगाव : नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. सुवर्णनगर जळगावात गुरुवारी सोने दर प्रतितोळा ५६ हजार २०० रुपयांवर पोहोचले. चांदी प्रतिकिलो दर उच्चांकी ७० हजारांवर गेले आहेत.

आठवडाभरापासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोने गेल्या दोन-अडीच वर्षांतील उच्चांकी दरावर आहे. ३१ डिसेंबर रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोने दर प्रतितोळा ५५ हजार ४०० रुपयावर गेले होते. यानंतर एक आणि दोन जानेवारी रोजी दर स्थिर राहिले. चार जानेवारीला सोन्याचे दर प्रतितोळा ५६ हजार होते. त्यात २०० रुपयांची वाढ होऊन गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याचे दर प्रतितोळा ५६ हजार २०० रुपये झाले. सात ऑगस्ट २०२० रोजी सोने दर प्रतितोळा ५७ हजार २०० रुपयांपर्यंत गेले होते. आता सातत्याने सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे सोने पुन्हा ५७ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

हेही वाचा – आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातील आश्रमशाळेत गुरांसह शेळ्यांचा वावर; स्नानगृह, शौचालयाअभावी विद्यार्थिनींची गैरसोय

सोमवारी चांदीचे दर प्रतिकिलो ६८ हजार १०० रुपये होते. ते मंगळवारी ६९ हजार ७२२ रुपयांवर गेले. बुधवारी दरात ८०० रुपयांची घसरण होऊन ते ६९ हजार २०० रुपये प्रतिकिलो होते. गुरुवारी सकाळच्या सत्रात चांदीचे दर ८०० रुपयांनी वाढले. चांदीचे दर महिनाभरात प्रतिकिलो सहा हजार रुपयांनी वाढले.

आंतरराष्ट्रीय सोने बाजारात जगभरातील प्रमुख बँकांकडून सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे, तर चीनकडून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी चांदीची मागणी वाढली असल्याने दरात मोठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. भारताचा रुपया इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. भारतीय ग्राहकांकडून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने चांदीची मागणी वाढती आहे. परिणामी दरात वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिक कपिल खोंडे यांनी सांगितले.