लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : सेवानिवृत्त शिक्षकाचे गटविमा योजनेचे सव्वालाख रुपये देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारताना शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकेला येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. धुळे जिल्ह्यातील तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे गट विमा योजनेचे एक लाख ३३ हजार रुपये आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्यांनी मंजूर केले होते.

सदरच्या देयकासंदर्भात बाकीचे काम शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जगताप (रा.नाशिक) यांच्याकडे होते. ही रक्कम देण्यासाठी मुख्याध्यापिका जगताप यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने मुख्याध्यापिका जगताप यांना चार हजार रुपये स्विकारताना पकडले. त्यांच्याविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-गोदापात्र दुषित करणाऱ्यांनो सावधान…; नाशिक पोलीस-मनपा संयुक्त पथकाकडून आता कारवाई

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नसते. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायमच जनजागृती करण्यात येत असली तरी लाच देणे आणि लाच घेण्याचे प्रकार सुरु असतात. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, असा अनेकांचा समज झाला आहे. यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. कोणत्याही कामासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना पैसै देवू नयेत, कोणी पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.