जळगाव – अहमदाबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला मंगळवारी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावानजीक अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. अपघातात तीन प्रवासी जखमी झाले.

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. खासगी प्रवासी बस अहमदाबाद येथून औरंगाबादकडे जात होती. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने गिरणा पुलाजवळ बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

हेही वाचा – नाशिकरोड रेल्वे स्थानकात लवकरच उद्वाहन, सरकता जिना

हेही वाचा – नाशिक: बापानेच लेकाच्या जीवाचा केला सौदा, पालखेड धरण परिसरातील हत्येचं गूढ उलगडलं

सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बस ज्या ठिकाणी उलटली तो खोलगट भाग नसल्याने अधिक हानी टळली. जखमींना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलीसही दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.