नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कालावधी संपुष्टात येत असून नवीन विश्वस्त मंडळात चार भाविक प्रतिनिधींना स्थान देण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने विश्वस्त मंडळ निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी नेमणुकीसाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह धर्मदाय सहआयुक्त कार्यालय, जानकी प्लाझा, पहिला मजला, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे करावा, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शि. ना. दुतोंडे यांनी केले आहे. विश्वस्त मंडळात चार भाविक प्रतिनिधी विश्वस्तांच्या नेमणुकीबाबत अधिसुचना २६ मे रोजी जारी करण्यात आली आहे. या अधिसुचनेची एक प्रत, अर्जाचा विहित नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी धर्मदाय सहआयुक्त कार्यालय, नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि महानगरपालिका येथे सूचना फलकावर लावण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा