नाशिक : शहरातून जाणाऱ्या पेठ रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघात वाढत असून खड्ड्यांमुळे स्थानिकांना पाठ, मणक्यांच्या विकारांनाही तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिका रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आक्षेप घेत सोमवारी स्थानिक महिलांसह इतर रहिवाशांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला. तथापि, आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे महिला आणि पोलिसांमध्ये वाद झाले. नेहमीप्रमाणे निव्वळ आश्वासन देत यंत्रणेने आंदोलन करण्यापासून आम्हाला रोखल्याचा आरोप महिलांनी केला.

नाशिक शहरातून पेठला जाणाऱ्या मार्गावर महापालिका हद्दीत ठिकठिकाणी खड्डे पडले असून तो धोकादायक झाला आहे. त्यामुळे अपघात होत असून स्थानिकांना ये-जा करणेही जिकिरीचे ठरले आहे. परिसरातून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी इंद्रप्रस्थ कॉलनी, वेदनगरी, नमन हॉटेल परिसर, तवली फाटा, मखमलाबाद रस्ता परिसरातील रहिवासी पेठ रस्त्यावरील मेघराज बेकरीसमोर एकत्र जमले. यात महिलांची संख्या मोठी होती. मागील आंदोलनावेळी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याने स्थानिकांनी रास्ता रोको करण्याचे ठरविले. याची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. त्यांनी आंदोलनास हरकत घेतली. आंदोलनासाठी पूर्व परवानगी घेतलेली नाही. सध्या पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आंदोलन करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून महिलांना सांगण्यात आले.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

हेही वाचा >>> नाशिक : अंनिसने इतर धर्मीयांनाही दाव्यांविषयी आव्हान द्यावे; साधु, महंतांचे आंदोलन

आंदोलनास मज्जाव केल्याने महिला आणि पोलिसांमध्ये वाद झाले. यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना बोलावत आंदोलन करू इच्छिणाऱ्या महिलांना रस्त्यावरून बाजूला नेले. मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी १५ दिवसांत पेठ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले.

मात्र, त्यांच्या आश्वासनावर आंदोलक विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. स्थानिकांकडून केले जाणारे हे दुसरे आंदोलन होते. पहिल्या आंदोलनावेळी आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले गेले होते. मात्र काहीही झाले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. पेठ रस्त्यावर वास्तव्यास असणाऱ्या सर्वांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लहानग्यांना घेऊन महिला आंदोलनस्थळी जमल्या होत्या. कधीतरी रस्त्यावर पाणी मारले जाते. परंतु, काही वेळात पुन्हा धुरळा उडू लागतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या बिकट स्थितीकडे डोळेझाक केल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

हेही वाचा >>> नाशिक : जादूटोणा विरोधी कायदा अधिक कठोर करावा, अंनिसची मागणी

पाठ, मणक्यांचे विकार बळावले

रस्त्यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली असून मनपाकडून केवळ चालढकल सुरू असल्याचा आरोप सुमन गायकवाड यांनी केला. नौकरी, शाळा व अन्य कामकाजासाठी स्थानिकांना पेठ रस्त्याने दररोज ये-जा करावी लागते. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठ व मणक्यांचे विकार जडले आहेत. रस्त्याच्या अवस्थेमुळे या भागात रिक्षावाला येत नाही. पायी चालणेही कठीण झाले आहे. दिवसभर उडणाऱ्या धुरळ्याचा मारा दुकानदारांना सहन करावा लागत असल्याकडे गायकवाड यांच्यासह नागरिकांनी लक्ष वेधले.