जळगाव महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट आणि विरोधी भाजप यांच्यात गुरुवारी आंदोलनाची स्पर्धाच रंगली असल्याचे दिसून आले. बुधवारी महापालिकेची महासभा उपमहापौरांच्या वक्तव्याने आणि टक्केवारीबाबतच्या ध्वनिफीत ऐकविल्यामुळे गाजली होती. शिवसेना ठाकरे गटातर्फे शहरातील विकासकामांसह पिंप्राळा उपनगरातील शिवस्मारकाला विरोध करणार्या भाजपच्या नगरसेवकांचा जाहीर निषेध, तर भाजपतर्फे उपमहापौरांचा त्यांनी केलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांविषयीच्या वक्तव्याच्या जाहीर निषेधासाठी आंदोलन करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने महापालिकेची सतरामजली इमारत दणाणली होती.
हेही वाचा >>>ठाकरे गटाला धक्का; हकालपट्टीनंतर काही तासांत भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य!
महासभा विषयपत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा न होता अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आली. दोन महिन्यांनतर होत असलेल्या सभेच्या सुरुवातीलाच विषयांना सुरुवात होण्यापूर्वीच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या रामापेक्षा रावण श्रेष्ठ आहे या विधानामुळे वातावरण चांगलेच तापले होते. श्रीरामांचा अपमान करणार्या उपमहापौरांना व्यासपीठावरून खाली उतरावा, असा आग्रह भाजप सदस्यांनी धरला होता. या गदारोळात महासभा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब झाली होती. त्याचे पडसाद गुरुवारी उमटले. दुपारी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट व भाजप नगरसेवक सतरा मजलीसमोर आमने-सामने आले.
हेही वाचा >>>Grampanchayat election : उत्तर महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीला बळ, शिंदे गटाचीही मुसंडी
शिवसेना ठाकरे गटातर्फे विरोधकांवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. अंकित कासार जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी सां गितले की, महापौर, उपमहापौरांसह सहयोगी नगरसेवक हे विकासाचे राजकारण करतात. महासभेत विकासाच्या मुद्यांना भाजपच्या नगरसेवकांनी आडफाटा देत, आमच्या उपमहापौरांवर खोटे आरोप करीत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील काळात भाजपचे ५७ नगरसेवक असतानाही त्यांना शहराचा विकास करता आला नाही. त्यानंतर शिवसेनेचे महापौर, उपमहापौर झाले आणि विकासाचे पर्व सुरू झाले, त्यामुळे विरोधकांना हा विकास सहन होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा देत आहोत. विरोधकांनी विकासावर बोलावे. आता सहा महिन्यांनंतर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळेच रामाच्या नावाखाली मतपेरणी करायची आणि विकास करायचा नाही, हे भाजपचे षढयंत्र आहे, असा घणाघातही त्यांनी केला. जिल्हा संघटक मालपुरे, नगरसेवक प्रा. पाटील यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा >>>जळगाव: महापालिका आयुक्तपदाचा तिढा; पाच जानेवारीला पुढील कामकाज
भाजपतर्फे सत्ताधार्यांनी विकास थांबविल्याचा आरोप
भाजपतर्फे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारत, शाई लावत, पायाने तुडवीत जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे यांनी केले. आंदोलनात नगरसेवक मयूर कापसे, नगरसेविका शोभा बारी, प्रतिभा कापसे, महेश चौधरी, राजेंद्र मराठे, आदी सह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महानगराध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले की, जळगावचा विकास होण्यासाठी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुरेश भोळे यांनी शंभर कोटींचा निधी आणला आहे. त्यांपैकी 58 कोटींच्या विकासकामांचे महासभेत प्रस्ताव होते. मात्र, सत्ताधार्यांना शहराचा विकास होऊ द्यायचा नाही. त्यामुळे उपमहापौरांनी बेताल वक्तव्य करून गोंधळ घालून महासभा होऊ द्यायची नाही आणि विकास थांबवायचा, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपने केले उपमहापौरांना रावण!
भाजपतर्फे आंदोलनप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना चक्क रावण केले होते. रावणाच्या दहातोंडी प्रतिमेत उपमहापौर पाटील यांच्या चेहरा दाखविण्यात आला होता. महिला पदाधिकार्यांनी त्या प्रतिमेस जोडे मारत, शाई फेकत, पायाने तुडवीत जाहीर निषेध केला.