धुळे – सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी भर उन्हात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रभारी अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाच्या सरी किंवा थोडा वारा सुटला तरी शहरातील वीज पुरवठा तासंतास खंडित होतो, वाढत्या उष्म्यामुळे धुळेकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असताना खंडित वीज पुरवठ्यामुळे मुले आणि वयोवृद्धांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी जलकुंभ भरले जात नसल्याने धुळेकरांना आधी आठ दिवसानंतर मिळणारे पाणी आता १० ते १२ दिवसाआड मिळू लागले आहे, इन्व्हर्टर पुरेशा वीज दाबाअभावी चार्ज होत नाही. विजेवर आधारीत व्यवसाय डबघाईस आले आहेत. यंत्रमागधारक हैराण झाले असून त्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे.

हेही वाचा – अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ धुळे मनपा आयुक्त दालनासमोर अंघोळ, मनसेचे आंदोलन

विद्युत कंपनीकडून वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे, जीर्ण आणि लोंबकळणाऱ्या तारा, वाकलेले खांब बदलविण्याचे किंवा दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अटी-शर्तीनुसार कंपनी सुविधा देण्यात असमर्थ ठरत असल्याचे ठाकरे गटाने निवेदनात म्हटले आहे. वीज खंडित झाल्यावर कर्मचारी तास, दोन तासांनंतर दुरुस्तीसाठी पोहोचतात, त्यांच्याकडे अनेकदा दुरुस्तीची पुरेशी साधने नसतात. त्यामुळे नागरीक आणि कर्मचारी यांच्यात वाद होतात. आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे माजी आमदार प्रा. शरद पाटील महानगरप्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by thackeray group in dhule for smooth power supply ssb
Show comments