राज्यात नव्याने दाखल होणारे प्रकल्प एका पाठोपाठ गुजरातमध्ये स्थलांतरित होत असून महाराष्ट्रातील भूमिपुत्रांवर हा अन्याय होत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गट धुळे महानगरतर्फे करण्यात आली आहे. या अप्रिय निर्णयांच्या निषेधार्थ शुक्रवारी महानगर पालिका चौकात प्रतिकात्मक खोके दाखवून आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे ; सिन्नर तालुका दौऱ्यात आदित्य ठाकरे यांची अपेक्षा

फाॅक्सकाॅन प्रकल्पानंतर आता टाटा एअर बसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातेत गेला आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे केवळ बघ्याची भूमिका घेत असून केंद्र शासनासमोर ते मिंधे झाले असल्याची टीका यावेळी करण्यात आली. महानगरपालिका चौकात प्रतिकात्मक खोके दाखवून ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र आणि राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, आंदोलनात सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील आदींनी सहभाग घेतला.