लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा, यासह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी भडगाव येथे पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे आणि तालुकाध्यक्ष अभिमान हाटकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तालुकाध्यक्ष हाटकर यांनी शेतकर्यांच्या घरात अजूनही कापूस पडून असल्याचे सांगितले. कापूस खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत. व्यापारी आला तर कापसाला समाधानकारक भाव देत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना उधारी मागणारे चकरावर चकरा मारत आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकरी हतबल झाला असल्याचे सांगितले.

आणखी वाचा- आश्रमशाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर प्रबोधिनी, डॉ. विजयकुमार गावित यांचा मानस 

यावेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संघटनेच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पोहचविण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनात संघटनेचे भगवान चौधरी, शांताराम आचारी. देविदास पाटील, विलास देशमुख, मनोज परदेशी यांच्यासह तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Story img Loader