पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह समस्त स्त्री जातीचा अवमान करणारे वक्तव्य केले असून, यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारी करण्यात आली. त्यासाठी निदर्शने करीत मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा- नाशिक: मालेगावात दोन प्लास्टिक कारखान्याला आग; लाखोंचे नुकसान

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील पक्षाच्या कार्यालयापासून महापालिका इमारतीसमोरून निदर्शन करीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महापौर जयश्री महाजन, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पाचोरा येथील पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, मंगला बारी, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांच्यासह पक्षासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

मोर्चा महापालिकेमार्गे शहर पोलीस ठाण्यात धडकला. मोर्चेकर्‍यांनी केलेल्या विविध घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. ये सरकार हमसे डरती, पोलीस को आगे करती है, अपशब्द वापरल्याने पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, धरणगाव जसा गुन्हा दाखल तसा जळगावला गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आवाज कुणाचा शिवसेनेचा, पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आदी विविध घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा- नाशिक रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या मालवाहू डब्याला आग

याप्रसंगी पोलीस अधिकार्‍यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहसंपर्कप्रमुख वाघ, जिल्हा संघटक मालपुरे यांनी, जसा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्याप्रमाणे जळगावमध्ये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या दालनात चर्चाही करण्यात आली. पोलीस अधिकार्‍यांनी, तुम्ही दिलेल्या लेखी तक्रारीसंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन, तसेच चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासित केले. पालकमंत्र्यांविरुद्ध गुन्हा करण्याच्या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला.

हेही वाचा- जळगाव: जाहीर सभेस परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंचे समाजमाध्यमांतून भाषण

महापौर महाजन यांनी आमच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी जिल्ह्यात सभा घेतल्या, त्या गाजविल्या, कुणाविषयीही अपशब्द काढला नाही, तरीसुद्धा पालकमंत्र्यांनी सुषमा अंधारेंविषयी अतिशय बेताल असं वक्तव्य केलं आहे. समस्त स्त्री जातीचा अपमान आहे. उपनेत्या सुषमा अंधारेंची माफी मागून त्यांच्याबाबतचे शब्द पालकमंत्र्यांनी मागे घ्यावेत, अशी मागणी केली. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून लोकशाहीला कलंक लागला आहे. लोकशाही ही संपुष्टात आली आहे. आमच्या पोलीस बांधवांवरही दबाव आहे. त्यामुळे आमची काय दखल घेणार? त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून आमच्याशी ते त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. त्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनाही ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षकांकडून आम्ही त्यासंदर्भात त्यांचे म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात घेऊच. त्यानंतर आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही त्यांनी सांगितले

Story img Loader