लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहर काँग्रेसने हाती घेतलेल्या नाशिक बचाव, ड्रग हटाव मोहिमेंतर्गत कॉलेज रोड परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीला मानवी साखळीद्वारे विरोध दर्शविण्यात आला. यावेळी पुढील काळात पथनाट्यांच्या माध्यमातून महाविद्यालय व विविध चौकात अंमली पदार्थ, गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले.

nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Does the government want to resolve the Pathi dispute or not
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाही?
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
Nandurbar district fund for Sickle cell medicine
सिकलसेल औषध खरेदीचा निधी वर्षभरापासून पडून, नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता
homeopathic doctors allows to prescribe allopathic medicines
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाहीच?
Chief Minister Devendra Fadnavis directs to evaluate the health system Mumbai news
आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी सभागृह नेते राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मानवी साखळी उपक्रमात पदाधिकाऱ्यांसह युवकांनी सहभाग नोंदविला. शहरातील अमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे छाजेड यांनी स्पष्ट केले. मोहिमेचे संयोजक बागूल यांनी शहरात गुन्हेगारीबरोबर अमली पदार्थांचा साठा वाढला असल्याकडे लक्ष वेधले. या घटनाक्रमात युवक गुरफटत आहे. त्यांचे भविष्य वाचविण्यासाठी नाशिक वाचवा ही मोहीम दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-

आणखी वाचा-“नाशिकमध्ये पोलीस, सरकार अन् पालकमंत्र्यांच्या संगनमतानं…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

शहरातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी व अमली पदार्थांची तस्करी उखडून टाकण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून विविध चौक व महाविद्यालयात जनजागृती करण्यात येणार असल्याचे छाजेड व बागूल यांनी म्हटले आहे. आंदोलनात प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस डॉ. हेमलता पाटील, शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, एनएसयूआयचे अल्तमश शेख, संतोष ठाकूर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Story img Loader