महापालिका क्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे.
या मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात एकूण ६२८ बुथ, ९५ ट्रान्झिट टीम, ३९ फिरते पथक, ९ रात्रपाळीचे पथक अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी एकूण एक हजार ८७५ कर्मचारी, १३६ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी, आर. सी. एच. नोडल ऑफिसर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुथवरील रविवारच्या कामानंतर शहरात प्रत्येक घरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिला की नाही, याची खात्री करून घेण्यात येणार आहे. ज्या बालकांनी रविवारी डोस घेतला नाही, त्यांना घरी हा डोस दिला जाणार असून ही मोहीम पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे.
त्यासाठी एकूण ६१७ संघ व १२७ आयपीपीआय पर्यवेक्षक काम करतील. प्रत्येक संघात दोन कर्मचारी असतील व प्रत्येक पाच संघासाठी एक पर्यवेक्षक त्या कामाचे मूल्यमापन करणार आहे. मोहिमेसाठी महापालिका, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, कर्मचारी, विभागीय अधिकारी तसेच खासगी सहा. परिचारिका, अंगणवाडी, आयसीडीएस परिचारिका, सेविका, मदतनीस, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिग महाविद्यालय आदींचे सहकार्य करणार आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा