तुकाराम मुंढे यांच्या अकस्मात बदलीनंतर महापालिका आयुक्तपदी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गमे यांनी बुधवारी उस्मानाबाद जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सोडला असून ते गुरुवारी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. महापालिकेला १४ दिवसानंतर पूर्णवेळ आयुक्त मिळणार आहे.
महापालिकेतील कठोर शिस्त आणि पारदर्शक कारभार यामुळे मुंढे आणि सत्ताधारी भाजप यांच्यात वारंवार मतभेद झाले. आयुक्त लोकप्रतिनिधींना सन्मान देत नाही, समन्वय राखत नसल्याची भाजपची तक्रार होती. मुंढे यांची कार्यपद्धती भाजपला अडचणीची ठरत असल्याने सरकारने २२ नोव्हेंबर रोजी त्यांची बदली केली. त्यांना हटविल्यानंतर या पदावर सरकारने कोणाची नियुक्ती केलेली नव्हती.
दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली. यासंबंधीचा अधिकृत निर्णय मंगळवारी जाहीर झाला. सामान्य प्रशासन विभागाने महानगरपालिकेच्या आयुक्तपदी गमे यांच्या नियुक्ती केली. उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार गमे यांनी बुधवारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविला.
गुरुवारी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार आपण स्वीकारणार असल्याचे गमे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. महापालिकेत गमे यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. शहर विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना नाशिकला पाठवले होते. परंतु, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि मुंढे यांचे सूर जुळलेच नाही. गमे यांना समन्वयाने काम करावे लागणार आहे. त्यात भाजपने मुंढे यांच्या कार्यकाळात शहर हिताविरोधात झालेले निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे. हे निर्णय रद्द करणे योग्य की अयोग्य हे निश्चित करताना गमे यांची कसोटी लागणार आहे.