लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: वणी पोलिसांनी अवैध देशी दारु विक्री विरोधात धडक मोहीम सुरु केली असून देवठाण शिवारात केलेल्या कारवाईत ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडखे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटे अडीच वाजता देवठाण शिवारात छापा टाकण्यात आला.

देवठाण येथील भगवान गुंबाडे यांच्या घरामागील पडवीत एकूण एक हजार २४८ बाटल्या दारुचा साठा मिळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून गुंबाडेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे . वणी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय सुरु असतील तर त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader