नाशिक : इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या घोटी येथील रेल्वेव्दार दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस बंद राहणार आहे. याशिवाय माणिकखांब रेल्वेव्दारही मंगळवार आणि बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… नववर्ष स्वागत कार्यक्रमांवर पावसाचे सावट; आज महावादन

घोटीचे रेल्वेव्दार रविवारी सकाळी नऊपासून ते सोमवारी सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे. माणिकखांब येथील रेल्वेव्दार २१ मार्च रोजी सकाळी नऊपासून ते २२ मार्चच्या सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे. याबाबत वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. देवळे गावाकडून सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने घोटीकडे ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. माणिकखांब येथील नागरिकांना मात्र कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना दोन दिवस अडचण सहन करावी लागणार आहे.