लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: देशात सर्वदूर प्रामुख्याने उत्तर भारतात सुरू झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांत रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर कोलमडली आहे. उत्तर भारतातून भुसावळ-मनमाडमार्गे मुंबईला जाणार्‍या आणि मुंबईहून परतीचा प्रवास करणार्‍या लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे.

khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
Central railway special trains cancelled delayed
१० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब

मनमाड हे जंक्शन रेल्वे स्थानक असल्याने येथून परप्रांतात रेल्वेद्वारे जाण्यासाठी अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. सध्या पावसामुळे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी अयोध्या-कुर्ला साडेपाच तास, दिब्रुगड-कुर्ला साडेतीन तास, हावडा-पुणे २१ तास, शालिमार-कुर्ला १७ तास, गोरखपूर-कुर्ला काशी एक्सप्रेस पाच तास, कुर्ला-गोरखपूर सहा तास, गोरखपूर-पुणे सुपरफास्ट तीन तास आणि दानापूर-पुणे तब्बल दोन तासांच्या विलंबाने धावत असल्याचे दिसून आले. पावसामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

Story img Loader