धुळे : शहरासह परिसरातील तापमानाचा पारा ४० अंशापेक्षा अधिक वाढल्याने उकाडा वाढला. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरण पूर्णपणे पालटले. यामुळे मात्र प्रचंड उकाडा वाढला. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने उष्माघाताचा संभाव्य धोका असल्याची भीती व्यक्त करून शासकीय रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी पुरेशी उपाययोजना केली.
हेही वाचा : धुळ्यात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान तापमान वाढतेच राहिल्याने ग्रीन नेट, कुलर, पंखे, एअर कंडिशनर यांच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाल्याने आणि पावसाचा शिडकाव झाल्याने उन्हापासून संरक्षण झाले, पण उकाडा मात्र कमालीचा वाढला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहिले.