राजू शेट्टी, विनायक मेटे यांची घोषणा
महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेत युतीसंदर्भात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना बाजुला फेकल्या गेलेल्या महायुतीतील इतर घटक पक्षातील अस्वस्थता उफाळून आली आहे. भाजप-सेनेने सोबत न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटना महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे सुतोवाच खा. राजू शेट्टी व विनायक मेटे यांनी केले.
सेना-भाजपमध्ये युतीवरून चर्चा सुरू आहे. त्यात घटक पक्षांचा कुठेही विचार झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत आम्ही तिघे मिळून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेट्टी आणि मेटे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जागा वाटपाबाबत आमच्यात कोणताही वाद होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे शेट्टी यांनी नमूद केले. सेना-भाजपवर आम्ही विसंबून राहणार नाही. युती होवो अथवा न होवो आम्ही आमचे उमेदवार एकमेकांच्या सहकार्याने राज्यभरात उभे करणार आहोत. जिल्हा परिषदेत चांगले लोक पाठविण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणूकसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेत सेना व भाजपने आम्हाला बोलावले पाहिजे असा आमचा आग्रह नाही. आम्ही किती दिवस श्रावण बाळासारखी कावड हाती घ्यायची, असा प्रश्न करत शेट्टी यांनी आमच्या आघाडीचे प्रमुख लक्ष्य जिल्हा परिषद निवडणूक असल्याचे नमूद केले. महापालिकेच्या जागांवर इतर सहयोगी पक्षांना आम्ही सहकार्य करणार आहोत. या संदर्भात मुख्यमंत्री व शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनाही कल्पना देण्यात आल्याचे सूचित करण्यात आले.
दरम्यान, मेटे यांनी आपल्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षात समावेश झाला असल्याचे सांगितले. नावात शिव असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमात हे नाव धार्मिक असल्याने बसत नाही. त्यामुळे २० जानेवारीला पुण्यातील शनिवार वाडा येथे आमच्या नवीन पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा पक्ष राज्यातील ६ महापालिका व १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक लढणार आहे. शिवछत्रपती स्मारकाबाबत राज ठाकरे यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. स्मारकाविषयी जे राजकारण होत आहे ते दुदैवी आहे. स्मारकाबद्दल राज्यात कोणाला काही शंका असेल तर त्यांनी आम्हाला विचारावे असेही ते म्हणाले.