धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे तालुक्यातील रानमळा या गावाने नेत्यांना गावबंदी केली आहे. गावाच्या वेशीवर फलक लावून नेत्यांना गावबंदी करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वत्र आंदोलन सुरू झाले असतानाही सरकारकडून मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमिवर धुळे तालुक्यातील रानमळा ग्रामस्थांनी एकजूट दाखवित नेत्यांना गावबंदी केली आहे. गावातील जवळपास ४०० घरांवरही अशा स्वरूपाचे फलक चिकटविण्यात आल्याने हे संपूर्ण गाव आरक्षणाच्या मागणीसाठी  एकत्र आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा