नाशिक – निवडणुकीत हार झाली की चर्चा होत असल्याने सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. परंतु, महिन्यात सातत्याने कार्यक्रम होत असल्याने गर्दी कशी जमवायची, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत असल्याची कबुली व्यासपीठावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनास दानवे यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी कार्यक्रमांविषयी माहिती दिली. महिन्यापासून सातत्याने कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे कोणी ना कोणी पदाधिकारी, मंत्री येत आहेत. अशा स्थितीत रोज गर्दी जमवायची कशी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे. कार्यकर्त्यांची ही दुखरी नस लक्षात घेत दानवे यांनी एका कुक्कटपालन केंद्रातील गोष्ट सांगताच सभागृहात हशा पसरला. केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती दानवे यांनी दिली.
हेही वाचा >>>नाशिकचा गुलशनाबाद उल्लेख करण्यामागे खोडसाळ प्रवृत्ती; कारवाईचे पालकमंत्री दादा भुसे यांचे संकेत
१९७१ पासुन २०१४ पर्यंत गरीबी हटली नाही. २०१४ ला सर्व गरीब एकत्र आले. जोपर्यंत आपल्यातील गरीब पंतप्रधान होणार नाही, तोपर्यंत गरीबी हटणार नाही, असे म्हणून लोकांनी मोदींना पंतप्रधान केले. दारिद्रयरेषेखाली असणाऱ्या लोकांना गरीब कल्याण योजने अंतर्गत सहाय्य केले. ४० कोटीपेक्षा अधिक लोकांनी शुन्य रकमेवर बँकेत खाते उघडले. करोना आपत्तीमध्ये मोंदीनी केलेल्या कामामुळे पंतप्रधान असावा तर मोदींसारखा, असे लोक म्हणत असल्याचे दानवे यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>मनमाड पोलिसांकडून ४५ जनावरे ताब्यात
लोढा यांनी मोदी अध्यात्मिक व्यक्ती असल्याचे सांगितले. जगात त्यांची ख्याती आहे, सर्व देशाचे नेते त्यांना भेटतात. एक पाया पडतो. दुसरा बॉस म्हणतो. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा अपमान केला होता, त्याचा आपण बदला घेतला. आगामी काळात नाशिक फेस्टिव्हल दणक्यात करू, अशी घोषणा त्यांनी केली.