नाशिक : शहरात शिवसेनेने अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची मोहीस सुरु ठेवल्यानंतर आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला बळ देण्यासाठी हालचाली होऊ लागल्या आहेत. त्यानुसार शहरात रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिल अखेरीस महिला मेळावा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरासह जिल्ह्यात विस्तारासाठी शिवसेना जोरकसपणे कामाला लागली आहे. विशेषत्वाने ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. अलीकडेच ठाकरे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाची महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत. नाशिकरोड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी लवकरच शहर कार्यकारिणीसह इतर पदाधिकारी निवडले जाणार असून त्यात जास्तीत जास्त महिलांना काम करण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते. तसेच नाशिकमध्ये रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याने त्यासाठी सर्व महिलांनी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही मार्गदर्शन केले होते.

हेही वाचा… नाशिकमधील सिटीलिंकची बस सेवा ठप्प, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे हाल; वाहक अकस्मात संपावर

हेही वाचा… Maharashtra News Live : “मविआतून बाहेर पडा, भाजपाबरोबर चला, नाही तर ते मला तुरुंगात टाकतील”, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर संजय शिरसाट म्हणाले…

या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन एप्रिल अखेरीस रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला मेळाव्याविषयी चर्चा करण्यात आली. अद्याप मेळाव्याची तारीख निश्चित नसली तरी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रथमच महिला मेळावा होणार असल्याने त्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi thackeray in action mode womens meeting in nashik at the end of april asj