भक्ती आणि उत्साहाचे दर्शन

सायंकाळी स्तंभावर रासचक्र चढल्यावर सुरू होणारा भक्ती आणि उत्साहाचा मेळा रात्रभर सुरूच असतो. रात्र पुढे सरकते, तसे आनंदाला अधिकच उधाण येते. राधा आणि कृष्ण यांच्या निस्सीम प्रेमाचे प्रतिक असलेल्या ‘रासक्रीडा’ उत्सवाची महती काही वेगळीच आहे. त्यामुळेच कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील रासक्रीडा उत्सवाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. उलट दरवर्षी उत्सवाच्या लोकप्रियतेत वाढच होत आहे. यंदाची रासक्रीडा २४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

केवळ एक धार्मिक उत्सव म्हणून नव्हे, तर समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा उत्सव म्हणून या रासक्रीडा उत्सवाकडे पाहिले जाते. दरवर्षी आश्विन शुद्ध पौर्णिमेस मुल्हेर येथील श्री उद्धवमहाराज समाधी संस्थानच्या वतीने या रासक्रीडेचे आयोजन केले जाते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी इतर राज्यातील भाविकही मोठय़ा प्रमाणावर उपस्थित राहतात. या वर्षी दोन दिवस पौर्णिमा असल्याने उत्सव दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी साजरा होणार आहे. रात्रभर गाण्यात येणारी शास्त्रीय संगीतावर आधारीत उत्तर हिंदुस्थानी पद्धतीची भजने हे या उत्सवाचे वेगळेपण म्हणावे लागेल.

या रासक्रीडादरम्यान अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ पदांचे गायन केले जाते. रासचक्र चढविल्यानंतर रात्री मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, पखवाजच्या गजरात रामशाळेतून समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. मंदिरात रात्री दहाच्या सुमारास भजनांना सुरूवात झाल्यावर ती सकाळी आठ वाजेपर्यंत चालतात. या रासक्रीडेच्या कामांमध्ये प्रत्येक समाजाला सामावून घेतले जाते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काम दिले जाते.

अशा या अनोख्या उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री उध्दव महाराज समाधी संस्थानच्या वतीने किशोरमहाराज पंडित तसेच  मुल्हेरकर उध्दव परिवाराच्या वतीने सतीश उपासनी, श्याम पंडित यांनी केले आहे.

बुधवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी रासचक्र स्तंभावर चढविण्यात येणार असून रात्री साडेनऊ वाजता श्रीकृष्ण-राधा-गोपिका यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री १० ते सकाळी आठ या वेळेत भजन होणार असून गुरुवारी सकाळी आठ वाजता रासचक्र उतरविण्यात येणार आहे.

रासक्रीडा उत्सवाचा इतिहास

महाभारतकालीन मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने (इ.स. पूर्व ३०००) सुरू केला. मुल्हेरच्या उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० पासून उत्सवाला अधिक प्रोत्साहन दिले. सुमारे २५ फुट व्यासाचे केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या चक्राला ‘मंडळ’ म्हणतात. श्रीकृष्ण आणि गोपिका वृंदावनात अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असे मानले जाते. त्या मंडळाचे प्रतीक म्हणजे हे रासचक्र होय. आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना म्हणजेच सायंकाळच्या संपत वेळेप्रसंगी हे रासचक्र भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते.

Story img Loader