जळगाव – प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात गुरुवारी दुपारी विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ झाला. जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

पिंप्राळा उपनगरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी ऐतिहासिक रथोत्सवात भक्तीचा मेळा रंगला होता. रथाला पानाफुलांनी सजवून, आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली. रथोत्सव पाहण्यासाठी खानदेशातील विठ्ठलभक्त आले होते. गुरुवारी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पाचला विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा महाअभिषेक व पूजन झाले. सकाळी सातला वाणी समाजातर्फे विलास व मोनाली वाणी, पंकज व जागृती वाणी, भगवान वाणी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी साडेअकराला मंदिराचे पुजारी श्याम जोशी यांच्या मंत्रोच्चारात वाणी समाजातर्फे मयूर वाणी यांच्या हस्ते रथाची महापूजा झाली. त्यानंतर दुपारी बाराला माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, भाजपचे रोहित निकम, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते रथाची महाआरती झाली. याप्रसंगी माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, परशुराम सोमाणी, नगरसेवक विजय पाटील, नगरसेवक मयूर कापसे, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, रथोत्सव समितीप्रमुख अनिल वाणी, राकेश वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Lalbagh Ganesh utsav Mandal, Lalbagh Ganesh,
पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
pune ganesh utsav
Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना
eco-friendly Ganeshotsav organized in educational area of ​​Savangi
‘ग्रीन गणेशा!’ यावर्षी सावंगीचा गणेश देणार निसर्गप्रेमाचा संदेश
ganesh Chaturthi 2024 astrology
गणपती बाप्पांच्या आगमनाने उघडणार ‘या’ तीन राशींसाठी नशीबाचे दरवाजे; आजपासून प्रचंड धनलाभ, तुमची रास यात आहे का?
Markets are crowded on the occasion of Ganoshotsav 2024
चैतन्योत्सव…; गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी,कार्यकर्त्यांची लगबग
Mashal Yatra of Thackeray group starts from buldhana
१७ दिवसांत १५१ गावांतून प्रवास; ठाकरे गटाच्या मशाल यात्रेला बुलढाण्यातून प्रारंभ
buldhana shegaon gajanan maharaj today114th death anniversary
संतनगरी शेगावात गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रम

हेही वाचा – नाशिक : सावाना अभ्यासिकेत प्रवेशासाठी आता ई व्यवस्था, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न

बारीवाडा भागातील रथ चौकातून महाआरतीनंतर दुपारी साडेबाराला जानकाबाई की जय व पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषात माजी मंत्री जैन, आमदार भोळे आदींसह भक्तगणांनी दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटला. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंग हे भाविकांचे आकर्षण ठरले. श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी, रथोत्सव मार्गावर आयोजक व भाविकांच्या स्वागतासाठी फराळ, चहापाणी व पिण्याचे पाण्याची मोफत सेवा करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रथ सोमाणी व्यापारी संकुलाजवळील मुख्य चौकात आला. तेथे विठ्ठलभक्तांचा मेळा जमला होता. रथोत्सवानिमित्त पिंप्राळ्याच्या मुख्य रस्त्यावरील श्री भवानीमाता मंदिरापासून मुख्य चौकापर्यंत व्यावसायिकांनी विविध वस्तू, पदार्थ, खेळणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. शिवाय, रस्त्यालगतच्या खुल्या भूखंडांवर मुलांसाठी पाळणे, झुले, फिरत्या मोटारगाड्या यांसह विविध खेळण्या खेळण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच तेथे मुलांची गर्दी दिसून आली. सुमारे २८ लाखांपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिक: आरोग्य दूत तुषार जगतापचा गुटखा तस्करीत सहभाग; पोलिसांच्या ताब्यात

रथोत्सवाला १४८ वर्षांची परंपरा

पिंप्राळ्यात (कै.) तोताराम नथ्थूशेठ वाणी यांची एकुलती कन्या जानकाबाईचे तरुण वयात निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी श्री पांडुरंगाचा एक सुंदर लाकडी कोरीव काम केलेला रथ श्री विठ्ठल मंदिरास अर्पण केला. तेव्हापासून जानकाबाई की जयच्या जयघोषाने पिंप्राळानगरीत आषाढी एकादशीला रथ काढण्याची परंपरा सुरू आहे. रथाला १४८ वर्षे पूर्ण होत आहेत.