एलएल. बी. आणि एलएल. एम. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन विषयांच्या फेरतपासणीसाठी (रिड्रेसल) २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपासून विधी अभ्यासक्रमाच्या (एलएल. बी. द्वितीय सत्र व एलएल. एम.) निकालात त्रुटी असून, पुन्हा तपासणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे केली होती. २८ मार्चला विद्यापीठात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील सहा विधी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक प्रतिनिधी यांच्यासमवेत कुलगुरूंनी बैठक घेतली होती. निकालाबाबत चर्चा झाली होती. बैठकीतील निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी एलएल. बी.च्या सहा आणि एलएल. एम.च्या दोन विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्याकंन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झालेला आढळून आला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा