वाचकांची दमछाक टाळण्यासाठी मोबाईल व्हॅन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य-संस्कृती क्षेत्राचा मानबिंदू अशी ओळख असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाने (सावाना) आता काळानुरूप बदलत आधुनिक पद्धतीने सेवा देण्यास सुरुवात केली आहे. वाचनालयात आलेल्या बहुतांश वाचकांचा वेळ वेगवेगळ्या खात्यातील पुस्तके शोधण्यात जातो. वाचकांची अशी दमछाक टाळण्यासाठी लवकरच ‘मोबाइल व्हॅन’ शहर परिसरात फिरणार आहे.

सार्वजनिक वाचनाय नाशिक (सावाना)च्या वतीने वाचकांची अभिरुची जपण्यासाठी व्याख्यान, परिसंवाद, जिल्हा साहित्यिक मेळावा यासह विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. वाचनालयात आल्यावर आवडीच्या लेखकाचे पुस्तक शोधण्यासाठी याआधी यादी पद्धतीचा अवलंब करून वाचकांना पुस्तके शोधावी लागत होती. आता, संगणकाच्या मदतीने ‘ई-कामकाज’ करत कुठल्या कपाटात कुठले पुस्तक ठेवले याची अद्ययावत माहिती वाचकांना दिली जात असल्याचा दावा सावाना करत आहे. मात्र या संगणकीय कामकाजाची वाचकांना माहितीच नसल्याने बहुतांश वाचकांचा वेळ हा वाचनालयात आल्यावर पुस्तकांची शोधाशोध करण्यात जातो.

सद्यस्थितीत वाचनालयात

कथा, काव्य, नाटक, ललित, कादंबरी, संशोधन, चरित्र, धार्मिक यासह ज्योतिष, पर्यटन अशा विविध विषयांवरील एक लाख ७५ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातील बहुतेक पुस्तके जीर्ण अवस्थेत आहेत. पुस्तकांना कुजका वास येत आहे.

वेगवेगळ्या कपाटात वाचक पुस्तके शोधत असतांना पुस्तकांची मूळ जागा बदलली जाते. आपल्याला हवे असलेले पुस्तक नेमके कोठे आहे हे शोधण्यात वाचकांचा वेळ जात असताना बऱ्याचदा ते पुस्तक दुसऱ्याच वाचकाकडे असते किंवा वाचनालयात ते नाहीच, अशी वाचकांची तक्रार आहे.

पुस्तकांची यादी ‘अ‍ॅप’वर

वाचनालय आता ‘अ‍ॅप’ विकसित करत आहे. वाचनालयाच्या प्रत्येक सभासदाच्या स्मार्ट भ्रमणध्वनीत हे सॉफ्टवेअर देण्यात येईल. ज्या माध्यमातून वाचकांना घरबसल्या आपल्याला हवे असणारे पुस्तक वाचनालयात उपलब्ध आहे किंवा नाही, वाचनालयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती, सभासद शुल्क यासह अन्य माहिती मिळेल. तसेच लवकरच ज्येष्ठ वाचकांसह शहर परिसरात दूरवर राहणाऱ्या वाचकांसाठी ‘मोबाइल व्हॅन’ सुरू करण्यात येणार आहे. जानेवारीअखेपर्यंत हे वाहन शहर परिसरात वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार असून वाचकांना पुस्तके उपलब्ध करून देणार आहे.

वाचकांसाठी लवकरच फलक

वाचकांना ‘ई-साक्षर’ करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र वाचकांना ही यंत्रणा कशी वापरायची याविषयी माहिती नसेल तर पुस्तक देवघेव विभागाच्या आवारातच फलक लावत ‘कसे वापराल’ याची माहिती दिली जाईल. वाचकांना काही अडचणी असतील तर त्यांनी थेट संपर्क करावा. वाचकांच्या तक्रारीमधील सत्यता पडताळत आवश्यक बदल करण्यात येतील.    – प्रा. विलास औरंगाबादकर (सार्वजनिक वाचनालय नाशिक, अध्यक्ष )