‘मेकिंग इंडिया हार्टस्ट्राँग सर्वेक्षण ‘चा अहवाल
नाशिक : निरोगी असल्याची समजूत असणाऱ्यांपैकी ३८ टक्के भारतीय मधुमेही असून २८ टक्के निरोगी व्यक्ती मधुमेहपूर्व स्थितीत आहेत. विशेष म्हणजे तब्येतीच्या बाबतीत अनेक जण डॉक्टरांऐवजी गूगलला प्राधान्य देत असल्याचे निष्कर्ष ‘मेकिंग इंडिया हार्टस्ट्राँग ‘सर्वेक्षणात उघड झाले आहे. येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज चोपडा यांनी अहवालात वेगवेगळ्या मुद्यांंवर लक्ष वेधले आहे. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्यांपैकी दोनतृतीयांश व्यक्तींना एकतर हृदय आणि रक्तवाहिन्यांचा आजार आहे किंवा त्याचा धोका असल्याचेही उघड होत आहे.
हे सर्वेक्षण दोन भागांत विभागण्यात आल्याचे डॉ. चोपड यांनी सांगितले. लोकांचा हृदयाच्या आरोग्यविषयीचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षात हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांची वास्तविक संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी यामध्ये प्रश्नावलीवर आधारित मुलाखती आणि एचबीए वन सी (सरासरी शर्करा स्तर) आणि लिपिड प्रोफाइल टेस्ट्स यांचा समावेश करण्यात आला. शुद्ध रक्तवाहिन्या टणक होण्याच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे, खासकरून युवा पिढीची बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामुळे त्यांच्या बाबतीत हा आजार बळावत आहे. शुद्ध रक्तवाहिन्या टणक होण्याशी संबंधित कोरोनरी स्टेनोसिसमुळे जवळपास ३० टक्के लोक आजारी आहेत. असे आजार आपल्याला होऊ नयेत यासाठी जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल घडवून आणणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. चोपडा यांनी नमूद के ले.
नााशिकच्या हार्मोनी हेल्थ क्लबचे डॉ. यशपाल गोगटे यांनी मधुमेह बरा होत नसला तरी व्यवस्थापनामार्फत त्यावर नियंत्रण ठेवता येते, असे मांडले. त्यासाठी आरोग्यदायी खाणे आणि नियमितपणे शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. उच्च रक्तदाब किती जोखमीचा ठरू शकतो याविषयीही जागरूकता खूप कमी आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब हा हृदयरोगाला कारणीभूत ठरू शकणारा घटक असू शकतो याची जाणीव नाही. नाशिक शहरात ही चिंता सर्वात कमी आहे. दुसरे द्वितीय श्रेणीतील शहर असलेल्या विजयवाड्यात हे प्रमाण सर्वात जास्त (८१ टक्के ) आहे. ५० टक्के लोकांना नियमितपणे शारीरिक काम आणि निरोगी आहारामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका टाळला जाऊ शकतो, असे वाटते. मदुराई शहरात हे प्रमाण ५५ टक्के म्हणजे सर्वाधिक, तर नाशिकमध्ये ते सर्वात कमी म्हणजे के वळ २५ टक्के आहे. डॉक्टरांकडे नियमितपणे जाणे गरजेचे असल्याचे फक्त १७ टक्के भारतीयांना वाटते. ५९ टक्के लोक आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी किंवा डॉक्टरकडे जावे अथवा नाही किंवा आरोग्यविषयक तपासण्या करून घ्याव्यात की नाही याचा निर्णय घेण्यासाठी गूगलवर अवलंबून असतात. सर्वाधिक वाईट बाब म्हणजे एकतृतीयांश लोक व्हाट्सअपवरील माहितीवर विश्वास ठेवतात, असे सर्र्वेक्षणात उघड झाले आहे.