लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: येवला तालुक्यात पाण्याची टंचाई अधिक आहे. अलनिनोचा प्रभाव लक्षात घेऊन जुलैअखेरपर्यंत पाणी पुरवठा होईल, अशा प्रकारे नियोजन करून कुठल्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासंदर्भात तक्रार प्राप्त होता कामा नये, अशी सूचना आमदार छगन भुजबळ यांनी केली. शहरात पुराचे पाणी शिरून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक नाल्यांतील अडथळे दूर करावेत, असेही त्यांनी सूचित केले.

amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Deep investigation into bogus crop insurance Devendra Fadnavis assures Nagpur news
बोगस पीक विम्याची सखोल चौकशी; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
Kalammawadi dam, Satej Patil, leakage of Kalammawadi dam, Kalammawadi dam news,
काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करावी, सतेज पाटील यांची मागणी
Ganesh Naik Minister post , Navi Mumbai water,
गणेश नाईकांच्या मंत्रिपदामुळे शहराला वाढीव पाण्याची आस, बारवी धरणाचे पाणी मिळण्याची आशा बळावली
Katraj Kondhwa road traffic jam, Katraj Kondhwa road,
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश !
Sewage channel cover Pune, Pune roads,
झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !

भुजबळ यांनी येवला येथील प्रशासकीय संकुलाची पाहणी केली. यावेळी विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. तातडीने हे खांब पुन्हा उभे करून वीज पुरवठा सुरळीत करावा. शहरात गेल्या वर्षी पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले होते. नैसर्गिक नाल्यांतील अडथळा दूर करून कुठेही अनधिकृत बांधकाम होऊ नये, याची दक्षता घ्यावी. यावर्षी त्याची पुनरावृत्ती नको म्हणून उपाय योजना तातडीने कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.

आणखी वाचा-महागाईवर नियंत्रणासाठी केंद्राचे प्रयत्न: कैलास विजयवर्गीय यांचे आश्वासन

येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावाची सद्यस्थिती, येवला नगरपरिषदेच्या कोपरगाव तालुक्यातील तलाव, येवला शहरातील स्वच्छता, येवला शहर पावसाळापूर्व कामे, येवला आणि ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तलावातील पाण्याची स्थिती, राजापूर आणि ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव आणि १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या कामांचा आढावा घेतला. खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बी-बियाणे उपलब्धता, पीक कर्ज, जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना भरपाई, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. यावेळी प्रशासकीय संकुलात टप्पा दोन अंतर्गत इतर प्रशासकीय कार्यालय, उपाहार गृह, परिसरातील सौंदर्यीकरण कामे व लहान मुलांसाठी खेळणीसह मैदान या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

Story img Loader