नाशिक – बछडा पिंजऱ्यात अडकल्यानंतर मादी बिबट्याने परिसरात डरकाळ्या फोडणे सुरु केल्याने वनविभागाला मातृप्रेमापुढे माघार घेत बछड्याला मुक्त करावे लागले. नाशिकरोडच्या हंडोरे मळा परिसरात ही घटना घडली.२६ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ऋषिकेश चंद्रे (चार) हंडोरे मळा येथील पत्र्याच्या शेडबाहेर खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्या त्याला फरफटत नेत असताना ऋषिकेशचे वडील प्रकाश चंद्रे यांनी बिबट्यावर झडप घालत त्याचे मागचे पाय धरून ठेवत आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने ऋषिकेशला सोडून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला बिटको आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच

या घटनेनंतर माजी नगरसेवक जगदीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी विक्रम कोठुळे यांनी वनविभागाकडे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी के लीहोती. त्यानंतर वन विभागाने पिंजरा लावला. बुधवारी साडेसातच्या सुमारास पिंजऱ्याच्या दिशेने आवाज येऊ लागला. बछडा पिंजऱ्यात अडकल्याने मादी बिबट्या परिसरात डरकाळ्या फोडत असल्याचे लक्षात आले. बछड्याला नेल्यानंतर मादी बिबट्याकडून परिसरातील नागरिकांना त्रास होईल, हे ध्यानात घेऊन वन विभागाचे अधिकारी अनिल आहेरराव यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला.