नाशिक – बिबट्या समोर असतानाही भीतीने गाळण उडण्याऐवजी आदिवासी महिलेने घरातील आपल्या तीनही मुलांना सुखरुपपणे बाहेर काढून घराचा दरवाजा बंद करुन बिबट्यास घरातच बंद केले. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी महिलेने दाखविलेल्या या धैर्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

सुरगाणा तालुक्यातील आवळपाडा येथे दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू होती. मातीचे दिवे लावून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्रीचे जेवण आटोपून कमलेश भोये हे ओसरीवर निवांतपणे टीव्ही पहात बसले होते. टीव्ही पाहण्यात सर्व मग्न असताना काही क्षणात त्यांचा कुत्रा बिबट्या मागे लागल्याने दरवाजातून पळत आला. घराचे पुढील आणि मागील दरवाजे समोरासमोर असल्याने कुत्र्याने मागील दरवाजातून पळ काढला. बिबट्याला बाहेर पडण्याचा अंदाज न आल्याने तो घरातील कोपऱ्यात अडकला. कोपऱ्यातून सुटका करुन घेण्यासाठी बिबट्याने शर्थीने प्रयत्न केले. कच्च्या विटांची भिंत असल्याने भिंत पोखरून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला. घरात जळणासाठी असलेले सरपणही अस्तव्यस्त झाले. साधारणपणे तासभर हे नाट्य घरात सुरु होते.

Senior leaders are making urgent efforts to address insurgency in constituencies during assembly elections
बंडखोरांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ, गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Stampede at Bandra Station
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!

हेही वाचा – बंडखोरांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ, गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न

हेही वाचा – लाखोंचा खाद्यतेल, मसाला साठा जप्त

हे सर्व होत असताना परिसरातील हिराबाई दळवी या महिलेने शांतपणे घरात अडकलेल्या तीन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दरवाजे बंद करून घेतले. या प्रकाराची माहिती पोलीस पाटील कमलेश महाले यांनी भ्रमणध्वनीने बाऱ्हे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. कवर यांना दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आवळपाडा गाठत रात्रभर बिबट्यावर पाळत ठेवली. नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक सावर्डेकर, सहायक उपवनसंरक्षक कांबळे यांनी तातडीने दखल घेऊन वन्यजीव पथकास पाचारण केले. रातोरात नाशिक येथून पिंजरा आणि बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देणारी गन मागविण्यात आली. त्याद्वारे बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. अखेर पहाटे पाच वाजता बिबट्याला पिंजऱ्यात टाकून नाशिक येथे नेण्यात आले. बिबट्याच्या नाकाला थोड्याफार प्रमाणात इजा झाली आहे. उपचारानंतर अधिवासात सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी कवर यांनी सांगितले.