लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शीर्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष, संघटनात्मक पातळीवरील मरगळ आणि बदलत्या राजकारणाने अधांतरी होऊ पाहणारे भवितव्य या एकंदर स्थितीत मनसेतील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत असताना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदमुक्त करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. पत्रात त्यांनी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करणार असल्याचे म्हटले असले तरी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ते वेगळा पर्याय शोधतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पक्षात सर्व आलबेल नसल्याचे चित्र उघड झाले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
manipur cm biren singh resignation
२१ महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
delhi cm Atishi Marlena resigned
आतिशी यांचा राजीनामा; रचनात्मक विरोधक म्हणून काम करण्याची पक्षाची भूमिका
Manipur CM N Biren Singh resigns
N Biren Singh Resigns : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा; अमित शाहांची आजच घेतली होती भेट
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Chhagan Bhujbal allegations against Sharad Pawar regarding Telgi case pune news
तेलगी प्रकरणात राजीनामा घेण्याची शरद पवारांंना घाई; छगन भुजबळ यांचा आरोप

दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्षांना पत्र देत शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी आजवर आपल्यावर विश्वास टाकला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी, मनसे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षाची मानाची पदे दिल्याचे दातीर यांनी म्हटले आहे. आपण पदास न्याय देऊ शकत नसलो तर त्यावर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यामुळे शहराध्यक्ष पदावरून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. यापुढे महाराष्ट्र सैनिक म्हणून बांधील राहून पक्ष हितासाठी कार्यरत राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का बसला आहे.

हेही वाचा…. नंदुरबार: मोटार दालनाच्या आगीत सहा ट्रॅक्टर भस्मसात

कधीकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता. महानगरपालिकेत मनसेची सत्ता होती. शहरात पक्षाचे तीन आमदार होते. नंतर पक्षाला घरघर लागली. अनेकांनी भाजपसह अन्य पक्षांचे पर्याय निवडत मनसेला रामराम ठोकला. त्यामुळे मागील मनपा निवडणुकीत पक्षाचे केवळ बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक निवडून आले. मनपाची सत्ता गेल्याचे शल्य राज यांना कायम आहे. पुढील काळात त्यांचे नाशिककडे काहिसे दुर्लक्ष झाले. आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर राज यांनी नाशिकमध्ये पुन्हा लक्ष घातले.

हेही वाचा…. धुळे: थकीत पगारासाठी मनपा कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्या अंतर्गत जिल्हा व शहर पातळीवरील प्रमुख पदांमध्ये खांदेपालट करण्यात आले. त्या अंतर्गत जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. परंतु, ते या पदावर फार रमले नाहीत. नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी राज यांनी अमित ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. अमित ठाकरे यांनी दौरे करून स्थानिक पातळीवर संवाद राखला. संघटनात्मक बांधणी मजबूत नसल्याने पक्षात एकप्रकारे मरगळ आलेली आहे.

काही महिन्यांपूर्वी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिका अनेकांना पसंत पडत नाही. शीर्ष नेतृत्वाकडून स्थानिक पातळीवर लक्ष दिले जात नसल्याची काहींची भावना आहे. त्याची परिणती राजीनाम्यात झाल्याची चर्चा होत असली तरी मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना ती अमान्य आहे. व्यक्तिगत कारणास्तव दातीर यांनी राजीनामा दिला असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. खुद्द दातीर प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. दातीर यांच्या राजीनाम्याबाबत स्थानिक पदाधिकारी अनभिज्ञ होते.

Story img Loader