कौटुंबिक हिंसाचार आणि त्यातून घडणाऱ्या अप्रिय घटनांचा विचार करत नाशिक ग्रामीण पोलिसांनी विवाहेच्छुक जोडप्यांसाठी आडगाव येथे विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू केले खरे, तथापि, दोन आठवडे उलटूनही या केंद्राकडे कोणी फिरकलेच नाही. नाशिक शहरापासून आडगाव हे काहीसे लांब असल्याने ग्रामीण भागातील विवाहेच्छुक त्या ठिकाणी जाण्यास उत्सुक नाहीत, अशा काही कारणांमुळे या उपक्रमास प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जाते.

Commissioner Dr Indurani Jakhar instructed department heads to set office hours for listening to citizens complaints
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Sessions Court District Judge R G Waghmare decisions on Durgadi fort
दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस यंत्रणेतील विविध विभाग करीत असतात. त्यातील एक म्हणजे महिला शाखा. या शाखेत वर्षांकाठी सरासरी ४९० हून अधिक प्रकरणे ही केवळ कौटुंबिक हिंसाचार, शारीरिक शोषण, मारहाण अशा स्वरूपात प्राप्त होतात. त्या प्रकरणांचा अभ्यास केल्यावर त्या तक्रारी किरकोळ असतात. पण केवळ गैरसमज आणि नात्यांचा होणारा बागूलबुवा यामुळे तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाची संख्या लक्षात घेऊन तरुण पिढीला अशा समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून विवाहेच्छुक जोडप्यांसाठी विवाह समुपदेश केंद्र आकारास आले.

पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या हस्ते दोन आठवडय़ांपूर्वी या केंद्राचे उद्घाटनही झाले. या केंद्राच्या माध्यमातून विवाहेच्छुकांच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. त्यात मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. विवाहानंतर येणाऱ्या तक्रारींचा अभ्यास करत संबंधितांची भविष्यात उद्भवणाऱ्या अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी मानसिकता तयार करण्यात येणार आहे. आर्थिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या, जोडीदारांच्या शिक्षणातील तफावतीमुळे येणाऱ्या अडचणी, त्यातुन होणारे गैरसमज, नातेवाईकांचा दोघांच्या नात्यात असणारा अवास्तव हस्तक्षेप, विवाहामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या, नात्यांची वाढती जबाबदारी आणि त्याची व्याप्ती, नात्यांची जपवणूक याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व मार्गदर्शन केंद्र नि:शुल्क स्वरूपात करणार आहे. ग्रामीण पोलिसांनी केंद्राचे दूरध्वनी क्रमांक जाहीर केले. तरुण पिढीने त्याचा लाभ घ्यावा, असा प्रयत्न आहे; परंतु आजतागायत एकही विवाहेच्छुक या केंद्राकडे फिरकलेला नाही.

प्रसिद्धीचा अभाव

या उपक्रमांची पुरेशा प्रमाणात प्रसिद्धी झाली नाही. पोलिसांची भिस्त केवळ प्रसिद्धी माध्यमावर अवलंबून आहे. विविध महाविद्यालय, विवाह नोंदणी केंद्र तसेच अन्य ठिकाणी या उपक्रमाची माहिती देण्याचा प्रयत्न झाला नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारे नोंदणी अर्ज एक तर ऑनलाइन पद्धतीने किंवा पोलीस ठाण्यात जाऊन भरणे अपेक्षित आहे. केंद्र शहराबाहेर आडगाव येथे असल्याने बहुतांश युवक-युवती त्या ठिकाणी जाण्यास उत्सुक नसतात. या अडचणीचा विचार झाला नसल्याचे दिसून येते.

इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन

विवाहोच्छुक वधू-वरांनी विवाहपूर्व समुपदेशन केंद्रासाठी नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालय, ग्रामीण भागातील पोलीस ठाणे तसेच ग्रामीण पोलिसांच्या nashikruralpolice.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२५३-२३०३०४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader