नाशिक : जिल्हा बँके तील ठेवी परत मिळविण्यासाठी जिल्ह्य़ातून शंभरपेक्षा अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कें द्र कार्यालयासमोरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी ठिय्या दिला. ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा पाहता बँकेच्या अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेणे टाळले. एका संचालकाने जिल्हा उपनिबंधकांकडे बोट दाखवत ठेवीदारांची बोळवण केली. या सर्व पार्श्वभूमीवर पैसे परत न मिळाल्यास बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्हा बँके तील कर्मचाऱ्यांनी त्यांची निवृत्तीनंतरची रक्कम आणि अन्य ठेवी या बँकेत गुंतवल्या. बँके ची आर्थिक परिस्थिती ढासळत असून व्याज मिळणे बंद झाले आहे.  ठेवीही परत के ल्या जात नाहीत. कर्मचाऱ्यांना मिळणारी गॅच्युइटीची रक्कम ही आयुर्विमामार्फत राष्ट्रीयीकृत बँके कडून वर्ग होत आहे. ती रक्कम संबंधित सेवकाला न देता त्याची ठेव खात्यात जमा होत आहे. त्या रकमेचा अन्यत्र वापर के ला जात आहे. दुसरीकडे बँके ची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना बँके त वादग्रस्त भरती करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणावर न्यायालयीन खर्चासाठी पैसा वापरला जात आहे. परंतु, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी बँके कडे पैसे नाहीत. या विरोधात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे विजय मोगल यांनी नमूद केले.

संचालक मंडळाने आंदोलनकर्त्यांची भेट घेणे टाळले. तसेच विद्यमान कार्यकारी संचालक कैलास पिंगळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत ठेवी देण्याचा चेंडू जिल्हा उपनिबंधकांकडे टोलवला. या पार्श्वभूमीवर पैसे वेळेत न मिळाल्यास बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ठेवी परत मिळत नसल्याने ज्येष्ठ मंडळींना करोना महामारीच्या संकटात वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक चक्रव्यूह भेदताना अनेकांच्या नाकी नऊ आले.  नामदेव गाडे यांनी आपली कै फियत मांडली. त्यांची साधारणत १९ लाखांची ठेव बँकेत आहे. ते बँकेचे माजी कर्मचारी आहेत. त्या वेळी बँकेची स्थिती चांगली होती. सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीसह अन्य रक्कम बँकेत गुंतवली गेली. आता बँक ते पैसे परत  देत नाही. मुलांकडे पैसे मागितले तर आयुष्यभर नोकरी करून काय मिळवले, आम्हालाही आमचा संसार आहे, असे उत्तर ऐकावे लागते. बँकेत वारंवार फेऱ्या मारल्यास हजार किं वा दोन हजार रुपयांवर बोळवण करण्यात येते, असे गाडे यांनी सांगितले. राधा देशमुख यांनीही आपले गाऱ्हाणे मांडले. पतीने बँकेत साधारणत ५० लाखांची ठेव गुंतवली आहे. आता वयोमानाप्रमाणे त्यांना बँकेत येणे जमत नाही. पती अर्धागवायूमुळे त्रस्त आहे. मेंदूज्वरही असल्याने महिन्याकाठी केवळ औषधांसाठी १० हजार रुपये खर्च लागतो. अशा स्थितीत घरभाडे आणि औषधोपचार करायचे कसे, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला.