लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव : मालेगावातील निवृत्त अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लू या आजाराचा शहरात नव्याने शिरकाव झाल्याने लोकांनी धसका घेतल्याचे चित्र आहे.

मालेगाव कॅम्प भागातील निवृत्त अधिकाऱ्यास स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाल्यानंतर गेल्या १० एप्रिल रोजी नाशिकमधील रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असतानाच २१ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लू आजारामुळे मृत्यू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तिंचे नमुने तपासणीसाठी घेतले. सर्वच नमुने नकारात्मक आल्यावर आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी या संदर्भात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या संदर्भात शहरात सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. तसेच स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची माहिती तातडीने महापालिकेस द्यावी, अशा सूचना खासगी डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-पायी मोर्चा काढणारे जिवा पांडू गावित साडेतीन कोटींचे धनी

सर्दी, खोकला, ताप, चालताना दम लागणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी तातडीने तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. तसेच घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. -डॉ. जयश्री आहेर (आरोग्य अधिकारी,मालेगाव महापालिका)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired officer died due to swine flu in malegaon mrj
Show comments