नाशिक – राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे आषाढी एकादशीनिमित्त दोनशेपेक्षा अधिक जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. हे नियोजन नाशिक विभागास चांगलेच फायदेशीर ठरले असून आषाढी वारीतून एक कोटी ४९ लाख २२,३५९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. विभागातून आषाढी वारीसाठी सर्व आगारातून दोनशेपेक्षा अधिक जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. विभागातून ९८६ बस फेऱ्या मारण्यात आल्या. या बससेवेचा सर्वसाधारण ३८,८८७, लहान मुले एक हजार ७६९, ज्येष्ठ नागरिक आठ हजार ८३८, महिला २६, ४५८ आणि ७५ वर्षापुढील गटात १३,३४० प्रवाश्यांनी लाभ घेतला. साधारणत: ७०.४३ टक्के लक्ष्य पूर्ण झाले.

Story img Loader