लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरातील भद्रकाली परिसरात १३ पेक्षा अधिक वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेस पंधरवडाही उलटत नाही तोच, पेठरोडवरील दत्तनगराजवळील हरिओम नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उत्तमराव उगले यांच्या उगले सदनच्या आवारात उभ्या असलेल्या पाच दुचाकीसह एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

शहराच्या विविध भागात वाहनांची जाळपोळ, तोडफोडीसारखे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. अलीकडेच भद्रकाली परिसरात काही दुचाकींसह चारचाकींची जाळपोळ करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पंचवटीत मंगळवारी पहाटे वाहन तोडफोडीचा प्रकार घडला. पंचवटीतील पेठरोड भागात कालव्यापलीकडे दत्तनगरलगतच हरिओमनगर आहे. हरिओम नगरात भाजपचे माजी नगरसेवक उत्तमराव उगले राहतात. त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच काही भाडेकरू राहत असून, ते सर्व जण व्यवसाय, नोकरीनिमित्त कामावर जातात. रात्री घराच्या आवारात भाडेकरूंची रिक्षा आणि चार दुचाकी उभ्या होत्या. उगले यांचीही दुचाकी उभी होती.

आणखी वाचा-वाहतूक सुविधांमध्ये बळकटीची आवश्यकता

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त उगले हे दिवसभर बाहेरच होते. मंगळवारी पहाटे एका चारचाकी वाहनातून पेठ रोडमार्गे सात-आठ गुंड हातात दांडके घेऊन आले. वाहनातून उतरून त्यांनी अंधारात उगले सदनाच्या आवारात उभ्या असलेल्या मनोज चंदनशिव, सागर चंदनशिव आणि मोरे यांच्या चार दुचाकींची, तसेच रिक्षाची तोडफोड केली. शिवीगाळ करून उगले यांच्या दारासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड केली.

तोडफोड सुरु असताना नजीकच्या घरातील वृद्ध महिला आणि त्यांचा मुलगा जागा झाला. त्यांनी गुंडांना पाहून आरडाओरड केली. अंधाराचा फायदा घेत सर्व गुंड शिवीगाळ करीत वाहनात बसून पळून गेले. सकाळी ही घटना कळल्यावर उगले यांनी पोलिसांना माहिती दिली. पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चौकशी करुन त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.