शहरातील ज्या मार्गावर वाहतूक पोलीस हेल्मेट, वाहन परवाना तत्सम बाबींवरून किरकोळ कारवाई करण्यात धन्यता मानतात, त्या कॉलेज रोडवरील धोकादायक वाहतुकीकडे संबंधितांकडून झालेले दुर्लक्ष भीषण अपघाताला निमंत्रण देणारे ठरणार असल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांनी काही उपाय योजना केल्या. मात्र, बेशिस्त वाहनधारकांनी ते उपाय अपायाचे कारण ठरवले. या मार्गावर भरधाव मोटारसायकल दामटणारे, कसरती करणाऱ्यांची कमतरता नाही. त्यात एसएमआरके, एचपीटी आणि बीवायके महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर रिक्षा चालकांची जत्रा भरते. महाविद्यालयांत ये-जा करताना विरुद्ध दिशेने मार्गस्थ होण्यात विद्यार्थीच नव्हे, तर प्राध्यापकांनाही आपले काही चुकल्याचे वाटत नाही. वाहतुकीचे नियम मोडून चाललेल्या अनागोंदीने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
उच्चभ्रुंची वस्ती आणि विविध महाविद्यालयांच्या सान्निध्यामुळे मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेला कॉलेजरोड बेशिस्त वाहनधारक, ठिकठिकाणी रात्रंदिवस बसणारी टोळकी, गर्दीत कसरती करणारे मोटारसायकलधारक आणि संपूर्ण रस्ता आपल्या मालकीच्या आविर्भावात वावरणारे रिक्षाचालक अशा घटकांमुळे बदनाम झाला आहे. सुरळीत वाहतुकीसाठी काही वर्षांपूर्वी कॅनडा कॉर्नर ते मॉडेल कॉलनीपर्यंतचा मार्ग कॉँक्रीटीकरण करताना या पट्टय़ात दुभाजक टाकले गेले. प्रमुख चौकात ये-जा करण्यासाठी मार्ग आहेत.
बीवायके महाविद्यालयासमोर वाहनधारकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्गिका खुली ठेवली गेली. कालांतराने ही खुली मार्गिका वाहतुकीला अडसर ठरत असल्याने ती लोखंडी जाळ्या उभारून बंद करण्यात आली. तिथून केवळ पादचारी ये-जा करू शकतील इतकीच जागा ठेवण्यात आली आहे. पण, ती जागा महाविद्यालयीन वाहनधारक युवा-युवतींना पुरेशी ठरली. अतिशय धोकादायक पद्धतीने वाहनधारक त्या जागेतून प्रवेश करतात. त्याचवेळी समोरून भरधाव वाहन आल्यास भीषण अपघात घडू शकतो. त्याची पर्वा न करता वाहनधारक हा धोका पत्करत असल्याचे दिसून येते. येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चौकात वाहतूक पोलीस कारवाई करतात. हेल्मेट, वाहतूक परवाना नसणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते.
याच मार्गावरील पुढील बाजूस एसएमआरके, एचपीची महाविद्यालयाचे प्रवेशद्वार आहे. कॅनडा कॉर्नरकडून येणारे वाहनधारक थेट प्रवेश करू शकतात. परंतु, मॉडेल कॉलनी कृषीनगर, सावरकरनगर बाजूकडून येणारे वाहनधारक महाविद्यालयात जाण्याकरिता कृषिनगर चौकाकडून विरुध्द दिशेने आपली वाहने दामटतात. मुळात, समोरून मोठय़ा संख्येने वाहने येत असताना चुकीच्या दिशेने विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही वाहने घेऊन महाविद्यालयात प्रवेश करत असल्याचे दिसून येते. विरुध्द दिशेने वाहने नेण्याची धडपड अपघातांना निमंत्रण देणारी आहे. दोन्ही महाविद्यालयांची प्रवेशद्वार म्हणजे रिक्षाचालकांचे अनधिकृत थांबे बनले आहेत. यापूर्वी एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत रिक्षा चालक घुटमळायचे. त्यावर रस्त्याच्या बाजूकडील संरक्षक भिंतीला पत्रा लावून ती बंदीस्त केली.
महाविद्यालयाचा त्रास मिटला, पण रस्त्यावर कुठेही थांबणे, रिक्षा आडवी लावणे, गाणी लावून प्रवासी शोधणे हे प्रकार ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. मार्गावरील व्यापारी संकुलात ये-जा करणारे ग्राहक आपली चारचाकी वाहने रस्त्यात किंवा लगत उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडीचा गुंता कमी होण्याऐवजी वाढत आहे.
कसरती करणाऱ्या वाहनधारकांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी गप्पांमध्ये दंग असणारे युवक-युवतींच्या जत्थ्यांची गर्दी ओसरत नाही. कॉलेजरोड किंवा संलग्न मार्गावर वाहने उभी करून गप्पाष्टके रंगवणारे घटकही सुरळीत वाहतुकीत बाधा आणतात. पोलीस यंत्रणा रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनाकडे दुर्लक्ष करते.