कामातील संथपणामुळे उत्पन्नात घट
शहराचा ‘स्मार्टनेस’ अधोरेखित करणारा ‘अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका’ रस्त्याचे काम संथपणे सुरू असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक लहान-मोठय़ा व्यावसायिकांच्या आर्थिक उत्पन्नावर याचा थेट परिणाम जाणवत असून त्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे आहे. व्यापारी वर्गाकडून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
औषध विक्रेते कुणाल शेळके यांचे गोळे कॉलनी परिसरात औषध विक्रीचे दुकान आहे. काम सुरू असल्याने ग्राहकांच्या गर्दीवर त्याचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित येणाऱ्या ग्राहकांसोबत सर्दी, खोकल्याच्या औषधासाठी येणारे ग्राहक येणे बंद झाले असल्याचे शेळके यांनी सांगितले.
खाद्य विक्रेत्यांनी रस्ता कामामुळे ग्राहकांसमोर गाडी कोठे लावायची, हा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. कामामुळे खाद्य पदार्थावर धूळ उडत असल्याने ग्राहक दुकानावर थांबणे टाळत आहेत. कोणी थांबलेच, तर वाहतूक विभागवाले त्याचे वाहन घेऊन जातात. अजून दोन-तीन महिने हा तोटा सहन करू शकतो, परंतु पुढे उपासमारीची वेळ येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खाद्य विक्रेत्यांनी केली आहे.
काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी रस्ता फोडला गेला, पण त्यानंतर काम पूर्ण बंद असल्याकडे भ्रमणध्वनी सेवा देणारे विक्रेते सचिन चव्हाण यांनी लक्ष वेधले. या कामामुळे ज्यांना केवळ तातडीचे काम आहे, अशीच मंडळी या ठिकाणी येत असून २० टक्केच काम होत असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली.
कापड विक्रेते सुरेश कृपलानी यांनी रस्त्याच्या संथ कामकाजावर नाराजी व्यक्त केली. रस्ता फोडून ठेवला. मात्र पुढे काम होत नाही. या पदपथावरील दिवे ही कामामुळे बंद असल्याने रात्रीच्या वेळी ग्राहक फिरकत नाहीत.
दुसरीकडे या परिसरात शिकवणी वर्ग आहेत. या ठिकाणी विद्यार्थी येतात. अंधाराचा फायदा घेऊन काही गैरप्रकार झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न कृपलानी यांनी उपस्थित केला
वाहनचालकांसह पादचारीही त्रस्त
मे महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपरेरेशन आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने ‘अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका’ या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात झाली. शासकीय कन्या विद्यालयाच्या बाजूने हा रस्ता पहिले सहा महिने मेहेर सिग्नल ते सीबीएस चौफुलीपर्यंत बंद होता. गेल्या आठवडय़ात हा रस्ता अशोक स्तंभावरील बेटापासून त्र्यंबक नाका चौफुलीपर्यंत एका बाजूने बंद करण्यात आला. दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.