नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतमधील इंडियन बँक शाखेवर वर्षात दुसऱ्यांदा दरोडा टाकण्यात आला. चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँक फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा – राजाभाऊ दिल्लीत, माणिकराव मुंबईत, हे ठरवून घेतले का ? खासदार सत्कार सोहळ्यात जुगलबंदी

हेही वाचा – मनमाड : रेल्वे पोलिसांच्या समयसुचतेमुळे दोन महिलांसह बाळाचे प्राण वाचले

अंबड- चुंचाळे औद्योगिक वसाहत चौकीच्या पोलिसांकडून बँकेतून काही चोरीस गेले काय, याचा तपास करण्यात येत आहे. घटनास्थळी सहायक आयुक्त शेखर देशमुखसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मागील वर्षीही इंडियन बँकेच्या या शाखेवर दरोडा पडला होता. यावेळी बँकेवर दरोडा पडल्यानंतर रात्री भोंग्याचा संदेश शाखा व्यवस्थापकसाठी गेला. परंतु, सदर व्यवस्थापकाची पुणे येथे बदली झाली आहे. त्यांनी रात्री या बँकेच्या व्यवस्थापकला फोन करून सांगितले. परंतु, जवळच राहणाऱ्या व्यवस्थापकाने दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. व्यवस्थापकांनी दूरध्वनी केला असता तरी चोरटे जेरबंद करता आले असते, अशी माहिती पोलिसांनी दिली.