महानगरपालिकेतर्फे रविवारी आयोजित ‘रन फॉर स्मार्ट नाशिक’ फेरीमध्ये सत्ताधाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी तसेच क्रीडाप्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले. या वेळी पालिकेच्या वतीने क्रीडापटूंचा गौरव करण्यात आला. अनंत कान्हेरे मैदानापासून फेरीला सुरुवात झाली. महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्र्यंबकरोड, मायको सर्कलमार्गे ही फेरी पुन्हा अनंत कान्हेरे मैदानावर आली. फेरीच्या मार्गावर ‘स्मार्ट नाशिक’ संदर्भात आयोजित विविध स्पर्धाविषयी जनजागृतीसाठी चित्ररथांद्वारे माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव, दुर्गा देवरे, किसन तडवी, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन यांनीही या फेरीत सहभाग घेतला. प्रास्तविक आयुक्त गेडाम यांनी केले. स्मार्ट नाशिक करण्यासाठी नाशिककरांनी साथ द्यावी तसेच मनपाने आयोजित विविध स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही गेडाम यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा