सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आरोग्य विभागाने ‘रिप्रॉडक्टिव्ह चाईल्ड हेल्थ’ अर्थात आरसीएच हे नवीन पोर्टल कार्यान्वित केले. आरोग्य विभागाकडून याबाबत प्रशिक्षण झाले. या पोर्टलच्या सेवेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतांना नाशिक महापालिका हद्दीत मात्र तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत कामास दिरंगाईने सुरूवात झाली आहे.
गरोदर मातांना प्रसूतीपूर्व काळात आरोग्य सेवा मिळाव्यात, याकरिता सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, गर्भलिंग निदान प्रकरणे हाताळतांना नवजात शिशुंची आकडेवारी अभ्यासता यावी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी यासाठी आरोग्य विभाग आधी मदर अॅण्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम (एमसीटीएस) वापरत होते. मात्र त्यावर माता व बालकांची स्वतंत्र नोंदणी होत असल्याने माहिती संकलनात काही मर्यादा येत होत्या. या कामात गतिमानता आणण्यासाठी नुकतेच रिप्रॉडक्टिव्ह चाईल्ड हेल्थ’ (आरसीएच) पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलवर विवाहित स्त्री-पुरुषांची नोंदणी करण्यात येत आहे. या माहिती संकलनात नवरा व बायकोचे नाव, त्यांना अपत्य किती, घराचा पत्ता आदी तपशील विचारण्यात येतो. ऑनलाईन पद्धतीने ही माहिती पोर्टलवर सर्व स्तरावर पाहता व वाचता येऊ शकते. ही नोंदणी होत असतांना त्या महिलेला एक सांकेतांक मिळतो. जो पुढील काळात वैद्यकीय देयके मिळवणे यासह अन्य काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. या माहिती संकलनामुळे भविष्यात आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार असून वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती, गैरव्यवहारावर नियंत्रण राहणार आहे.
या संबंधीचे प्रशिक्षण आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले. प्रशिक्षणानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या कामात आघाडी घेतली. जिल्ह्यातील ३७७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांवर त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून सर्व माहिती संकलित केली जात असून पुढील दोन ते तीन महिन्यात संकलनाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेत कामाचा अहवाल मागविला जातो. यामुळे बाळतंपणातील धोके, गरोदर माता त्यांना आवश्यक सोयी सुविधांबाबत सजग राहता येते. ग्रामीण भागात हे काम वेगाने सुरू झाले असताना नाशिक शहरात महापालिका उदासीन आहे.
अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक अडचणींचा पाढा ही कारणे पुढे केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातील काम सुरू झाले असून परिचारीकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत शहरात केवळ २५ -३० जोडप्यांची यावर नोंदणी करण्यात आली आहे.
विलंब
आरोग्य विभागाचे ‘आरसीएच पोर्टल’ काही तांत्रिक अडचणींमुळे सुरू होत नव्हते. याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील ९७ परिचारिकांना त्या बाबत प्रशिक्षण दिले असून ते प्रत्यक्ष माहिती संकलित करतील.
– डॉ. विजय देवकर (वैद्यकीय अधिकारी )