लोकसत्ता वार्ताहर

धुळे: शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षातर्फे मनपा अधिकार्यांच्या दालनात पाण्याच्या बाटल्यांची भेट देऊन ’पाणी पाजा’ आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, रस्ते दुरुस्ती करण्यासह पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी धुळे शहर जिल्हा काँग्रेसने महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

मुबलक पाणीसाठा असतानाही धुळेकरांना आठ ते १० दिवसाआड पाणी देण्यात येत असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. शहरातील वडजाई भागासह देवपूर भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. सत्ताधारी भाजपच्या महापौरांसह अन्य पदाधिकार्यांचा मनपा प्रशासनावर वचक नाही. पाणी पुरवठा विभागातही मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनात डॉ.सर्फराज अन्सारी, जमिल मन्सूरी, मुक्तार मन्सूरी, अकिल अन्सारी, जिया अन्सारी, नेहाल अन्सारी, गुड्डू काकर सहभागी झाले होते. काँग्रेसने मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदेालन केले.

आणखी वाचा- एकनाथ खडसे यांना का हवा खानदेश महाराष्ट्रापासून वेगळा? गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र

मनपा हद्दीतील गावांमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे, टंचाईसह अनेक समस्या आहेत. देवपूर, वलवाडीसह विविध भागातील रहिवासी वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. वेगवेगळ्या विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांवर चार्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. शहराला नियमीत पाणी पुरवठा देण्याच्या वल्गना सत्ताधार्यांनी केल्या. परंतु, पाणी प्रश्न कायम असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. शहर अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस युवराज करनकाळ, शाबीर शेख, अर्चना पाटील, हरी अजळकर आदी यावेळी उपस्थित होते.

Story img Loader