नाशिक: नाशिकचा पारा ४० अंशावर गेल्यामुळे उन्हाची प्रचंड दाहकता सर्वत्र जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीच्या गणपतीला २५ किलो चंदन उटीचा लेप लावण्यात आला. सोबत ५१ किलो मोगऱ्याच्या फुलांनी अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. मंदिरात चंदन व मोगऱ्याच्या सुगंध दरवळत आहे. चंदन लेपातील गणेशाचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील १०५ वर्षांची परंपरा असलेले रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे हे मंदिर आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाचा प्रसिध्द चांदीचा गणपती भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंडळाने आजवर समाजभान जपत आपले वेगळेपण अबाधित ठेवले. १९२८ मध्ये गंगाप्रसाद हलवाई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेले हे नाशिकमधील सर्वात जुने, अग्रगण्य मंडळ आहे.

आणखी वाचा-नाशिक : २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्यांना पाचव्यांदा परीक्षेची संधी

दरवर्षी नवीन मूर्ती बनविण्यापेक्षा मंडळाने १९७८ साली ११ किलो चांदीची मूर्तीची स्थापना केली. वाढता वाढता वाढे या उक्तीनुसार २००८ मध्ये २०१ किलोच्या भरीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भाविक मोठ्या प्रमाणात चांदी अर्पण करतात. त्यातून गणेशासाठी जवळपास ५० तोळ्यांचे सोन्याचे दागिने बनविण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले.